BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : मद्यपी कारचालकासह दोघांना बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मद्य प्राशन करून कार चावल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत असताना कारच्या डॅश बोर्डमध्ये पिस्तूल आढळून आली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना शनिवारी (दि. 10) पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे घडली.

सागर गोविंद आरुडे (वय 30, रा. पिंपळे गुरव), रामकिसन दशरथ लहासे (वय 54, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांनी फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आरोपी सागर मद्य प्राशन करून कार (एम एच 14 / पी 8209) चालवत होता. त्याबाबत त्याला अडवून पोलीस चौकशी करत असताना त्याच्या कारच्या डॅशबोर्डच्या डिकीत विना परवाना 25 हजार रुपये किमतीचे पिस्तूल आढळून आले.

याबाबत दोघांना अटक करून त्यांच्यावर आर्म अॅक्ट, मोटार वाहन कायदा आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.