Vadgaon Maval : गोकुळअष्टमी सप्ताह निमित्त पोटोबा मंदिरात प्रवचन सप्ताह

एमपीसी न्यूज- गोकुळ अष्टमी निमित्त वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या वतीने प्रवचन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार (दि. 16) पासून सुरू झालेल्या सप्ताहामध्ये आठ दिवस अखंड वीणावादन तसेच दररोज संध्याकाळी 5 ते 7 ह भ प गणेशमहाराज जांभळे व ह भ प दिलीपमहाराज खेंगरे यांचे संतचरित्र महात्म्य या विषयावर प्रवचन आहे. त्याचप्रमाणे रोज रात्री 9 ते 12 या वेळेत भजनसेवा केली जात आहे.

शुक्रवार (दि. 23) रात्री 10 ते 12 या वेळेत ह भ प नितीन महाराज काकडे यांचे श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन होणार आहे. शनिवार (दि. 24) सायंकाळी 5 वाजता दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. रविवार (दि. 25) दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद होणार असून सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सप्ताहाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, विश्वस्त गणेश ढोरे, अरुण चव्हाण, मंगेश खैरे, चंद्रकांत ढोरे, किरण भिलारे व काकड आरती भजनी मंडळ करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.