Dapodi : दांपत्यास मारहाण केल्या प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका दांपत्यास सहा जणांनी काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना दापोडी येथे शुक्रवारी (दि. 11) दुपारी घडली.

रिकी जोसेफ परदेशी (वय 32) संध्या चार्ल्स परदेशी (रा. रेंजहिल्स, खडकी), तंबी (पूर्ण नाव माहिती नाही. रा. पिंपळे गुरव), विकी रामचंद्र मारी, सगाई रामचंद्र मारी, सॅबॅस्टिन मोजेस ऍन्थोनी (वय 24, सर्व रा. दापोडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मोजेस चिंदोरे ऍन्थोनी (वय 53, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रिकी परदेशी, विकी मारी आणि सॅबेस्टिन ऍन्थोनी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोजेस ऍन्थोनी आणि आरोपी यांच्यात कौटूंबिक कारणावरून पूर्ववैमनस्य आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यावेळी आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी आणि त्यांची पत्नी यांना काठीने मारहाण करून जखमी केले. सहाय्यक निरीक्षक गजानन बनसोडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.