Talegaon Dabhade : राजकारणाचा लवलेश नसलेल्या लहानग्याने केले सुनील शेळके यांचे गुणगान

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. या दौऱ्यामध्ये शेळके यांच्या लोकप्रियतेचे अनेक अनुभव येत आहेत. सुदवडी गावात एका तीन वर्षाच्या लहान मुलाने गाणे गाऊन सुनील शेळके यांचे स्वागत केले.

ज्या मुलाला राजकारण, समाजकारण विकास या गोष्टीही समजत नाहीत पण सुनील शेळके यांच्याबद्दल लहान थोर यांच्या विषयी असलेले प्रेम, लोकप्रियता पाहून शेळके दिसताक्षणीच तो लहान मुलगा गाणे म्हणू लागला. हे पाहताच शेळके यांनी त्याला प्रेमाने जवळ उचलून घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.