Pune : प्रगती एक्स्प्रेस बुधवार ते रविवार दरम्यान रद्द

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस उद्या बुधवार 16 ऑक्टोबरपासून रविवार 20 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे. खंडाळा इथं मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रगती एक्स्प्रेससह अन्य गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. अशी माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे.

या मेगाब्लॉकमुळे मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेंजर 17 ते 19 ऑक्टोबर, मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर 15, 16 आणि 20 ऑक्टोबर, तर पनवेल-नांदेड स्पेशल गाडी 20 ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस 15 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर अशी धावणार आहे.

हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी एक्स्प्रेसही 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान पुण्यापर्यंत धावेल. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान पुण्यातून हैदराबादला रवाना होईल. पनवेल-नांदेड एक्स्प्रेस 17,18,19 आणि 21 ऑक्टोबर रोजी पनवेलऐवजी पुण्यातून नांदेडसाठी धावेल. नांदेडहून येणारी गाडी पुण्यापर्यंतच धावेल. त्यामुळे प्रवाशानी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.