Chakan : एमपीएससी परीक्षेमध्ये विजय शिंदे यांचे यश

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक ( अराजपत्रीत गट-ब ) या परीक्षेत खेड तालुक्यातील वाळद येथील विजय आनंदा शिंदे यांनी यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक परीक्षेसाठी एकूण 641 विद्यार्थी मुख्य परीक्षेस बसले होते. या पदासाठी राज्यभरात एकूण 35 पदांचा समावेश होता. मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी (दि. 27) जाहीर झाला. यामध्ये खेड तालुक्यातील वाळद गावातील विजय आनंदा शिंदे यांची राज्य कर निरीक्षक ( गट-ब ) या पदावर अनुसूचित जाती या प्रवर्गातून राज्यात तृतीय क्रमांकाने निवड झाली.

विजय शिंदे यांनी स्वर्गीय बाळासाहेब आपटे अभ्यासिका, राजगुरूनगर येथे अभ्यास केला. या परीक्षेसाठी सहायक सरकारी अभीयोक्ता (गट-अ) विशाल डोळस यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले स्वप्नील सांडभोर, डॉ. योगेश शेळके यांनी मार्गदर्शन केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.