Dehuroad : गर्दीचा फायदा घेत दुकानातून भांडी पळवली

एमपीसी न्यूज – दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दुकानातून कढई, पातेले आणि कुकर अशी भांडी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी चारच्या सुमारास देहूरोड बाजारात घडली.

_MPC_DIR_MPU_II

विशाल रमेश पारेख (वय 40, रा. मेनबाजार, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांचे देहूरोड येथील मेनबाजारात भांड्याचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या दुकानात गि-हाईकांची गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दुकानातून 4 हजार 800 रुपयांच्या सात कढई, 3 हजार 500 रुपयांचे पाच पातेले आणि 4 हजार 500 रुपयांचे तीन कुकर असा एकूण 12 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1