Sahakarnagar : भररस्त्यात मिळाली 13 जिवंत काडतुसे!

एमपीसी न्यूज – सहकारनगर येथील शाहू बँक चौकात आज सोमवारी (दि.22) सकाळी साडेदहाच्या सुमारास तब्बल 13 जिवंत काडतुसे (बंदुकीच्या गोळ्या) रस्त्यात पडलेल्या मिळाल्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक नागरिकाने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिसांना रस्त्यात मिळालेल्या काडतुसांबद्दल सांगितले. त्या माहितीनुसार तातडीने तेथे दाखल होत एकूण 13 जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या घटनेने परिसरात आणि पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.