Pune : शहीद हेमू कलानी यांना आदरांजली

एमपीसी न्यूज- भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणारे शहीद हेमू कलानी यांच्या 77 व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (दि. 21) पिंपरीच्या इंदिरा गांधी हायस्कुलच्या स्काऊट गाईड पथकाने हेमू कलानी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

क्रांतिकारी विचार प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरीच्या शहीद हेमू कलानी उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदिरा गांधी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अनिता नायर यांच्या हस्ते हेमू कलानी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाला क्रांतिकारी विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू सबनानी, इंदिरा गांधी हायस्कुलच्या शिक्षिका गीता सुतार, जान्हवी शेख, प्रतिभा पाटील, सफिया शेख, स्वाती सावंत, विनोद गायकवाड, गौरव विटकर, सामाजिक कार्यकर्ते अजित कंजवानी, रोहित बुलानी, सुंदर पहूजा, मनोहर जेठवानी, नरेश गेरेजा आदी उपस्थित होते.

पिंपरीच्या इंदिरा गांधी हायस्कुल, रामानंद चिदाकाशी हायस्कूल, जयहिंद हायस्कूलमध्ये देखील शहीद हेमू कलानी यांना आदरांजली वाहण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.