Pune : परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करताना पालिकेचे ‘अस्वच्छ’ लिखाण

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पुणे महापालिकेने विविध उपाययोजना आखल्या आहेत. जागोजागी रस्ता, शौचालय, मोकळ्या जागा स्वच्छ करण्याचे काम जोरात सुरू आहे. पुणेकरांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी शहरात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. मात्र या फ्लेक्सवरील अशुद्ध मराठी वाचून पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

फ्लेक्सची छपाई होण्यापूर्वी मजकूर तपासून न घेतल्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करताना पालिकेचे ‘अस्वच्छ’ लिखाणाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मराठी भाषा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे हे सांस्कृतिक, ज्ञाननगरी असलेले शहर आहे. महापालिकेने हे फ्लेक्स लावताना मराठीतील तज्ञ व्यक्तींकडून मजकूर वाचून का घेतला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. एरवी कोणत्या नाकोणत्या कामावर भरमसाठ खर्च करणारे महापालिका प्रशासन हे काम कसे विसरले, याची विचारणा पुणेकरांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.