Pune News : ‘स्टँड अप इंडिया’ योजनेअंतर्गत 15 टक्के मार्जिन मनी योजना

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेचा लाभ घेऊन प्रकल्प उभारण्यास इच्छूक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर आणि बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासनामार्फत देण्याची योजना कार्यान्वित आहे.

केंद्र शासनाने 2015 मध्ये ‘स्टँड अप इंडिया’ ही योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत सीडीबीने या योजनेसाठी सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला सीडबी हमी देईल. या योजनेंतर्गत संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के रक्कम द्यावयाची आहे.

‘स्टँड अप इंडिया’ या योजनेचा लाभ घेऊन प्रकल्पाची उभारणी केलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील नवउद्योजक घटकांना 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासन उपलब्ध करुन देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त नवउदयोजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.