PM Modi Dehu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू येथील सभेसाठी पीएमपी कडून 20 ई-बस

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Dehu Visit) आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते देहू गाव येथील संत श्री तुकाराम महाराज यांच्याशी या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यानंतर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. परंतु सभेचे ठिकाण ते वाहन पार्किंग हे अंतर साधारण दीड किलोमीटर इतके आहे. त्यामुळे नागरिकांची सभास्थळी जाताना गैरसोय होऊ नये यासाठी पीएमपी प्रशासनाकडून 20 ई- बस सोडल्या जाणार आहेत. पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी याबाबत माहिती दिली.

PM Modi Dehu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज देहू दौरा; वाचा सविस्तर वृत्त…

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Dehu Visit) हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत देहू गावातील संत तुकाराम महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर देहू गावातील माळवाडी याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेला जाणार्‍ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.