कौटुंबिक वादातून वडिलांनी केले चिमुकल्या मुलींवर चाकूने वार

एमपीसी न्यूज – कौटुंबिक वादातून वडिलांनीच आपल्या दोन मुलींवर चाकुने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.17) रात्री साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.
याप्रकरणी वडील विजय रामदास वायळ (वय 33, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), याला अटक करण्यात आली आहे. याबाबत त्याची पत्नी शीतल विजय वायळ (वय 28) हिने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय याने त्याच्या मुली शर्वरी (वय 6 वर्ष) आणि सई दीड वर्ष यांच्यावर गळ्यावर चाकूने वार केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय याचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री कौटुंबिक कारणातून पती-पत्नीची भांडणे झाली होती. त्या कारणावरून रागाच्या भरात विजय याने घरातील चाकूने मुलगी शर्वरी आणि सई हिच्या गळ्यावर वार केले आहेत. एमआयडीसी ठण्याचे फौजदार एच. बी. केकाणी तपास करत आहेत.