पहिल्या नेटसर्फ कॉर्पोरेट व्हॉलिबॉल अजिंक्यपद 2017 स्पर्धेल्या 19 फेब्रुवारीपासून सुरुवात

एमपीसी न्यूज – नेटसर्फ यांच्या तर्फे पहिल्या नेटसर्फ कॉर्पोरेट व्हॉलिबॉल अजिंक्यपद 2017 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिंबायोसिस स्कूल सेंटर, प्रभात रोड येथे दि.19 फेब्रुवारी 2017 पासून सुरू होणार आहे. 

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना नेटसर्फचे संचालक सुजित जैन यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून ही स्पर्धा विद्युतप्रकाशझोतात सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत होणार आहे. तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. 

ही स्पर्धा पुरूष व महिला गटांत होणार आहे. महिला गटांत इन्फोसिस, टेक महिंद्रा, ऍमडॉक्स्‌, टीसीएस, कॅपजेमिनी, सिंटेल, टाटा कम्युनिकेशन्स्‌, 3डीपीएलएम संघांचा, तर पुरूष गटात इन्फोसिस, टेक महिंद्रा, ऍमडॉक्स्‌, टीसीएस, कॅपजेमिनी, बीएनवाय मेलन, सिनेक्रॉन, इन्फोसिस, फोर्बस्‌ मार्शल, टाटा टेक्नॉलॉजी, हमींगबर्ड वेब संघांचा समावेश आहे. 

स्पर्धेत एकुण 60000रूपयांची पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये विजेत्या संघाला करंडक व 15000रूपये तर, उपविजेत्या संघाला करंडक व 10000हजार रूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच, याशिवाय प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ,उत्कृष्ट सेटर, उत्कृष्ट स्पायकर, उत्कृष्ट मिडल ब्लॉकर, उत्कृष्ट रिसीव्हर, उत्कृष्ट लिबेरो यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व संघातील खेळाडू, सामनावीर यांना पदक आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.