शहरविकासाची दृष्टी आमच्याकडेच – प्रकाश जावडेकर

१०० स्टेशने असलेली कार्यक्षम मेट्रो पुण्यात शक्य  
एमपीसी न्यूज – पीएमआरडीए ,मेट्रो ,नदी सुधारणा ,सुलभ प्रशासन यासह शहर विकासाची दृष्टी आमच्यकडेच असल्याचे सांगत 100  मेट्रो स्टेशन असलेली मेट्रो भावी काळात पुण्यात धावणे हे शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी केले. 
 
‘जयसन्स ग्रुप ‘ आयोजित ‘परवडणारे गृहप्रकल्प आणि केंद्र शासनाची धोरणे ‘या विषयावर आयोजित व्याख्यान आणि नागरिकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते 
 
महात्मा सोसायटीच्या मैदानावर (कोथरूड ) येथे आयोजित कार्यक्रमाला संयोजक अमृता देवगावकर ,मंदार देवगावकर ,’सस्टेनेबल इनिशिटीव्ज ‘ च्या अनघा परांजपे -केसकर ,सोसायटी अध्यक्ष उल्हास पवार , दिलीप वेडे -पाटील ,श्रद्धा प्रभुणे ,गणेश जाधव ,राजेंद्र आवटे ,मंदार केळकर , किरण दगडे आदी उपस्थित होते 

 
यावेळी नागरिंकांनी पीएमआरडीए ,उड्डाणपूल ,मेट्रो ,बांधकाम परवानग्यांचे बदलणारे नियम ,वाहतूक समस्या ,आदी विषयांवर प्रश्न विचारले .त्याला समर्पक उत्तरे देत गल्लीपासून दिल्लीत भाजप सरकार हे उत्तर असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले . 
 
ते म्हणाले ,’मोदी सरकार हे पूर्ण परिवर्तनाचा विचार करीत आहे . त्यामुळे एलईडी बल्ब पासून स्टेण्ट च्या किमती कमी करण्याचा विचार होत आहे . यापूर्वी त्यातून स्वतःचे खिसे भरण्याचा विचार केला जायचा. पुण्याला नदी स्वच्छतेसाठी आम्ही निधी दिला ,मेट्रो मंजूर केली आणि पीएमआरडीए मंजूर केले. मात्र ‘इंच इंच विकू ‘ म्हणणाऱ्या आधीच्या सरकारने 1997 मध्ये आम्ही मंजूर केलेली पीएमआरडीए कार्यान्वित केली नाही. 
 
पुण्याच्या बृहत आराखड्यात पुण्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार आम्ही करीत आहोत . त्यासाठी निधी देत आहोत . पुण्यात मेट्रोची एक लाईन जरी प्रस्तावित असली तरी 100 स्टेशनांची मेट्रो ,तीदेखील दिल्लीसारखी कार्यक्षम ,अस्तित्वात आणणे शक्य आहे . मेट्रोसाठी रस्ते खणण्यासारख्या ‘प्रसववेदना ‘होणार ,पण ,पुणेकरांनी त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे. अमृता देवगावकर यांनी सूत्रसंचालन केले ,मंदार देवगावकर आणि उल्हास पवार यांनी प्रकाश जावडेकर यांचे स्वागत केले.
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.