पिंपरीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – सकाळपासूनच उत्साहात सुरु असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेला अनुचित प्रकारांनी गालबोट लागले. पिंपरीमध्ये  भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भांडण झाल्यामुळे परिसारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरीगावात माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रासमोर भाजपाचे उमेदवार धन्ना आसवाणी यांना राष्ट्रवादीचे उमेदवार डब्बू आसवाणी यांनी मारहाण केली. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुंगळीकर यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भाजपाचे उमेदवार धन्ना आसवानी हे पिंपरी-गावातील केंद्रा बाहेर कार्यकर्त्यांसह उभे असताना मतदारांना फुस लावण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. डब्बु आसवाणी यांनी धन्ना आसवानी यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी घटनास्थळी येवून परिस्थिती नियंत्रणात आणली. अशी माहिती पोलिस निरीक्षक विवेक मुंगळीकर यांनी दिली.


   

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.