शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

नेहरुनगरमध्ये राहूल भोसले आणि राजेश पिल्ले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहूल भोसले आणि भाजपचे उमेदवार राजेश पिल्ले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आहे. ही घटना आज (मंगळवारी) पाचच्या सुमारास नेहरुनगर येथील क्रांती चौकात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राहूल भोसले आणि राजेश पिल्ले प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पिल्ले आणि भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारामारी झाली. कार्यकर्त्यांनी तलवारी हातामध्ये घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरात तणावपुर्ण परस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, शहराच्या विविध भागात वादावादीच्या घटना घडल्या आहेत. पिंपरी कॅम्पात राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांमध्येही वादावादी झाली आहे.

spot_img
Latest news
Related news