बिग्रेडीयर हेमंत महाजन यांचे शनिवारी चिंचवडमध्ये व्याख्यान

एमपीसी न्यूज – काश्मीरमधील ‘दहशत वाद आणि भारतासमोरील नक्षलवाद’ या विषयावर बिग्रेडीयर हेमंत महाजन यांचे येत्या शनिवारी (दि.25) चिंचवडमध्ये व्याख्यान होणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बिग्रेडीयर हेमंत महाजन यांनी 36 वर्षाच्या देशसेवेत आतंकवाद्यांविरुद्धच्या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला आहे. महाजन यांना अनेक शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रवेश विनामुल्य असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने व्याख्यानाला उपस्थित रहावे, तसेच अधिक माहितीसाठी सुरेंद्र कुलकर्णी यांच्याशी 9923578908 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.