जनता वसाहतीतील कॅनॉलमध्ये आढळले दोन दिवसाचे अर्भक

एमपीसी न्यूज – जनता वसाहतीतील कॅनॉलमध्ये स्त्री जातीचे दोन दिवसाचे अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जनता वसाहतीतील कॅनॉलमध्ये 25 फेब्रुवारी रोजी 4 वाजण्याच्या सुमारास स्त्री जातीचे दोन दिवसाचे अर्भक वाहत जाताना आढळले. याप्रकरणी पोलीस हवालदार मोरे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनैतिक संबंधातून अथवा स्त्री जातीचे अर्भक असल्याच्या कारणावरून हे अर्भक टाकून दिले असावे, असा कयास पोलिसांनी बांधला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए.जी.डफळ अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.