पिंपरी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यशवंत माने यांची बदली

विधानसभा विरोधी पक्षनेते यांच्या विशेष कार्य अधिकारीपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक आयुक्त डॉ. यशवंत माने यांची बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती  विधानसभा विरोधी पक्षनेते यांच्या आस्थापनेवर विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

यशवंत माने हे पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे एलबीटी, आरोग्य तसेच निवडणूक विभागाचे कामकाज होते. माने यांनी 2017 च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज पाहिले होते.

 

त्यांच्या बदलीनंतर त्यांच्याकडील खात्यांचीही विभागणी करण्यात आली असून यापुढे सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे प्रशासन, माहिती व जनसंपर्क विभाग तसेच एलबीटी विभाग देण्यात आला आहे. तर प्रवीण अष्टेकर यांच्याकडे निवडणूक विभाग तसेच चंद्रकांत खोसे यांच्याकडे आरोग्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

माने यांची बदली निवडणुकीपूर्वीच झाली होती. मात्र, आचारसंहितेमुळे त्यांचा आदेश आता काढण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.