भोसरीत ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.3) दुपारी चारच्या सुमारास भोसरी येथे घडला.

प्रसन्न जगन्नाथ गायकवाड (वय 32, रा. सायगाव, खेड), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक कुमार लालु पवार (वय 24, रा. शांतीनगर, भोसरी) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसन्न हा शुक्रवारी भोसरीतून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने त्याला जोरात धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. भोसरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. नाळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.