लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेत स्वप्निल सावंत, केरबा गुरव, निलम, शांती कृष्णन यांना विजेतेपद

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आणि फायर अॅण्ड सेक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जीवरक्षा आणि सुरक्षितता याकरिता जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेत स्वप्निल सावंत, निलम, केरबा गुरव, शांती कृष्णन यांनी 21 किलोमीटर अर्ध मॅराथॉन गटात तर अनुराग कोनकर, पुजा गवस, हितेश चौधरी, कविता रेड्डी यांनी 10 किलोमीटर गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद संपादन केले.

ही स्पर्धा 10 व 21 किलोमीटर या गटात पार पडली. स्पर्धेत 3000 हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.  21 किमी अंतराच्या एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेसाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथून सुरू झाली आणि बाणेर व विद्यापीठ मार्गे औंधपर्यंत आणि परत बालेवाडी स्टेडियम अशी मार्गक्रमण करत पूर्ण करण्यात आली.

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) पुरूष खुल्या गटात स्वप्निल सावंत 01:14:16 अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक संपादन केला तर डीजे रमन व हर्ष गौर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला खुल्या गटात निलमने 01:59:12 अशी वेळ नोंदवत विजेतेपद संपादन केले तर झरिन सिद्दकी व दुर्गा सील यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

पुरुष वरिष्ठ गटात केरबा गुरवने 01:37:04 अशी वेळ नोंदवत विजेतेपद संपादन केले तर सिद्धार्थ मुखर्जी व सचिन पांडेने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या वरिष्ठ गटात शांती कृष्णनने 01:57:18 अशी वेळ नोंदवत विजेतेपद संपादन केले तर कल्पना चौहाणने दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.

10 किलोमीटर  पुरूष खुल्या गटात अनुराग कोनकरने 00:35:01 अशी वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले तर  एसजीटी बीएस पाटील व विजय गायकवाड अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला खुल्या गटात पुजा गवसने 00:43:27 अशी वेळ नोंदवत विजेतेपद राखले तर निकीता गोवील व शर्वरी ईनामदार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

पुरुष वरिष्ठ गटात हितेश चौधरीने 00:44:16 अशी वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले तर  सुदेश एम भोसले व  मनोज ठाकूरने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला वरिष्ठ गटात कविता रेड्डीने 00:45:42 अशी वेळ नोंदवत विजेपद संपादन केले तर तारू मतेती व आरती मराठे यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेचा फ्लॉग ऑफ पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते करण्यात आला.

स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्या व उपविजेत्या तसेच तिस-या स्थानावरील स्पर्धकाला करंडक व पदक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण  भारतीय अग्निशमन दलाचे सल्लागार डी. के. शामी, पंचशिल ग्रुपचे प्रमुख अतुल चोरडीया, अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे, आरटीआय रवींद्र जाधव, एसपी. आयजी. व्हीआयपी सेक्युरिटी  कृष्णा प्रकाश, एनबीसीचे अध्यक्ष एस.के धेरी, महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे संचालक प्रभात रहांदळे, एमआयडीसी सीईओ संतेष वारीक, एफएसएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज धारकर, एफएसएआयचे राष्ट्रीय सेक्युरिटी अजित राघवन, यांच्या हस्ते करण्यात आले. आनंद जोशी, विरेंद्र बोराडे, महेश गव्हाने, त्रिलोकीनाथ तिवारी, अरविंद बिजवे, निखिल शाह, समीर चित्रे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल (1,2 व 3 क्रमांकानुसार)

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) पुरूष खुला गट

1. स्वप्नील सावंत 01:14:16

2. डीजे रमन 01:16:29

3. हर्ष गौर 01:165:49

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) महिला खुला गट

1. निलम 01:59:12

2. झरिन सिद्दकी 01:59:39

3. दुर्गा सील 02:06:23

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) पुरूष वरिष्ठ गट

1. केरबा गुरव 01:37:04

2. सिद्धार्थ मुखर्जी 01:37:56

3. सचिन पांडे 01:38:01

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) महिला वरिष्ठ गट

1. शांती कृष्णन 01:57:18

2. कल्पना चौहाण 02:02:32

10 किलोमीटर  पुरूष खुला गट

1. अनुराग कोनकर 00:35:01

2. एसजीटी बीएस पाटील 00:36:14

3. विजय गायकवाड 00:42:22

10 किलोमीटर  महिला खुला गट

1. पुजा गवस 00:43:27

2. निकीता गोवील 00:56:01

3. शर्वरी ईनामदार 00:57:54

10 किलोमीटर  पुरूष वरिष्ठ गट

1. हितेश चौधरी 00:44:16

2. सुदेश एम भोसले 00:45:16

3. मनोज ठाकूर 00:45:42

10 किलोमीटर  महिला वरिष्ठ गट

1. कविता रेड्डी 00:45:42

2. तारू मतेती 00:52:36

3. आरती मराठे 00:59:29

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.