जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज –  पिंपरी येथील  डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पवना इंडस्ट्रीज जवळ, पिंपरी, पुणे येथे स्त्री-रोग प्रसूतीतंत्र आणि स्वस्थवृत्त व योग विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त उद्या (दि.8) महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले आहे.

हे शिबिर उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 4 या कालावधीत होणार आहे. या शिबिरात महिलांच्या पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व चिकित्सा, स्त्रियांचे इतर आजाराबाबत तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबरोबरच स्थौल्य व मधुमेही रुग्णासाठी स्वस्थवृत्त व योग विभाग विशेष शिबिर घेण्यात येत आहे यामध्ये आहार, योगासने, व्यायामाबाबत मार्गदर्शन तसेच बी.एम.आय, बी.एम.आर व (fat percentage visceral fat muscle percentage metabolic age) चरबीची आणि स्नायूची टक्केवारी तपासणी करून औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येईल.

तसेच  स्त्री-रोग व प्रसूती तंत्र विभागाच्या प्रमुख डॉ. जयश्री पाटील यांचे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयी व्याख्यान 14 मार्च राजी दुपारी 2 वाजता   आयोजित करण्यात आले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे. या शिबीराच्या अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी मयूर देशमुख 973616306 , भारती मराठे 9921737277 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. पांडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.