पुण्यात वाहनचोरी करणारे दोन अल्पवयीन मुले ताब्यात

एमपीसी न्यूज – पुणे परिसरात 6 दुचाकींची चोरी करणा-या दोन अल्पवयीन मुलांना बिबवेवाडी पोलिसांनी सोमवारी (दि.6) ताब्यात घेतले आहे. या कारवाईतून सहा गुन्हे उघड झाले आहेत.
बिबवेवाडी पोलीस काल परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना दोन मुले गाडीवर संशयीतरित्या फिरताना अढळले. त्यावेळी पोलीस कर्मच्या-यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या दोघांनी बिबवेवाडी, वानवडी, लष्कर, सिंहगड या परिसरातील 6 दुचाकी चोरल्याचे कबुल केले. यातून सहा गुन्हे उघड झाले व त्यांच्याकडून 71 हजार रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनकर, गुन्हे पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, सहायक पोलीस निरीक्षक राजन जगदाळे, पोलीस उफ निरीक्षक बालाजी मगर, पोलीस हवालदार दत्तात्रय खुटवड, संजय पुणेकर, रविंद्र चिप्पा आदी यांनी केली.