महिला दिनानिमित्त गुगलतर्फेही महिलांना मानवंदना

एमपीसी न्यूज –  आज जागतिक महिला दिन सर्वच पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असताना गुगलनेही त्यांच्या डुडलच्या माध्यमातून जगातील सर्वच महिलांना मानवंदना दिली आहे.

यामध्ये गुगलने आठ चित्रे डुडलसाठी वापरली आहेत. ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील आई तिच्या मुलीसोबत तिचे काम एन्जॉय करताना दाखवली आहे. यामध्ये त्यांनी जगभारातील 13 महिलांचा समावेश केला आहे. ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. त्यामध्ये भारतातीतल रुक्मिणी देव अरुण दाले यांचाही समावेश आहे. त्याबरोबर त्यांनी भरतनाट्यम व प्राणीमात्रांसाठी केलेल्या कामाची दखलही यावेळी घेतली गेली आहे. याबरोबरच इजिप्तच्या पायलटचे लायसन्स मिळवणा-या पहिल्या महिला लोटफीआ एलनादी, अफ्रिकन महिला पत्रकार ज्यांनी नागरी हक्कासाठी लढा दिला अशा बी वेल्स, लंडनच्या लेखिका अदा लोवेलस, इटलीच्या आर्किटेक्ट डिझायनर लीना बो बार्दी अशा तोरा महिलांचा सन्मान या डूडलमधून करण्यात आला आहे.

महिला दिनाचीही क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली. 8 मार्च 1908  रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही जोरकसपणे केली.

अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च हा महिला दिवस 1943 साली साजरा झाला. 1971 सालच्या 8 मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.