गजा मारणे टोळीतील तडीपार गुंड जेरबंद

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील गजा मारणे टोळीतील तडीपार गुंडास गुन्हे शाखेच्या अॅन्टी गुंडा स्कॉड पथकाने जेरबंद केले. ही कारवाई 7 मार्चला कोथरूड येथे करण्यात आली.

अविनाश उर्फ पप्पू वसंत कडू (वय-34, रा. म्हातोबानगर, गल्ली क्रमांक 4, कोथरूड), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे 10 गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आले असतानाही तो कोथरुड येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.