पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड चोरीस!

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या निवासस्थानाच्या आवारात असलेले चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी तोडून नेले आहे. ही घटना काल (8 मार्च) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुरक्षारक्षक शिवाजी लेडघर (वय-49, रा. खेड, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक एस.पी.पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त कुणाल कुमार राहत असलेल्या बंगल्याच्या परिसरात हे चंदनाचे झाड होते. अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत हे झाड तोडून झाडाच्या खोडाचा मुख्य गाभा (5 हजार रुपये किमतीचा) कापून नेला. दोन ते तीन चोरट्यांचे हे काम असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.