बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

वल्लभनगर आगारातून वाहकाच्या साहित्याची चोरी

एमपीसी न्यूज – पिंपरीतील, वल्लभनगर आगारातील विश्रामगृहात वाहकाने ठेवलेले साहित्य दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी (दि.10) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली.


याप्रकरणी मनोज भांगावर (वय 28, रा. नळगीर, ता. उदगीर, जिल्हा लातूर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मनोज भांगावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून नोकरी करत आहेत. शुक्रवारी साडेआठच्या सुमारास ते बस घेऊन वल्लभनगर आगारात आले होते. तिकीट काढण्याची मशिन, तिकिटे असलेले पेटी विश्रामगृहात ठेऊन जेवणासाठी गेले होते.

दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी 10 हजार रुपये किमतीची तिकीट काढण्याची मशिन (एटीआयएम),  चार्जर, वाहक परवाना क्रमांक, 8 हजार 315 रुपयांची रोकड, तिकीट ठेवण्याचा 150 रुपये किमतीचा ट्रे, 9 हजार 426 रुपये किमतीची कागदी तिकीटे आणि एक पेटी असे 28 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले. पिंपरी ठाण्याचे पोलीस हवालदार कठोरे तपास करत आहेत.
spot_img
Latest news
Related news