वारज्यात रिक्षाचालकाचा महिलेवर अत्याचार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वारजेतील गोकुळनगर परिसरात एका रिक्षाचालकाने महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली.

दिलीप अण्णा जाधव (वय-33, रा. गोकुळनगर पठार, वारजे, पुणे) आणि संतोष शामराव धोत्रे (वय-30, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये वाद आहेत. त्यासंदर्भात ती बाहेरगावाहून पुण्यात आली होती.परंतू सासरच्यांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे आसरा शोधत असतानाच आरोपी रिक्षाचालक दिलीप जाधव याने तिला आसरा देण्याच्या बहाण्याने तो राहत असलेल्या घराच्या टेरेसवर आणि गोकुळनगर पठाराकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले.

त्यानंतर आरोपीने त्याचा मित्र संतोष धोत्रे याच्या घरी तिला सोडले असता त्याने 2 ते 6 मार्च दरम्यान वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस उप निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.