शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्वंयरोजगार मार्गदर्शन शिबिर व शिवबंधन सोहळा

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाच्या निमित्त शिवसेना महिला आघाडी लोणावळा व राजलक्ष्मी चँरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने बिजिस हाँटेल मध्ये महिलांसाठी स्वंयरोजगार मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. महिलांनी या शिबिराला उपस्थिती लावत स्वंयरोजगाराच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची माहिती घेतली.


शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस किर्ती फाटक यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना महाराष्ट्र जनरल सेनेचे अध्यक्ष मंगेश चंद्रमौर्य, लोणावळा नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक सुनिल इंगूळकर, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सिंधू परदेशी, कल्पना आखाडे, राजलक्ष्मी चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश गोयल, श्वेता गोयल, शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका राधिका हरिश्चंद्रे, माजी नगरसेविका जयश्री इंगूळकर, माजी सरपंच संजय भोईर, युवासेना मावळ अध्यक्ष अनिकेत घुले, लोणावळा अध्यक्ष तानाजी सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

किर्ती फाटक म्हणाल्या, आज समाजात महिला ही अबला नसून सबला झाली आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कतृत्वांवर भरारी घेतली आहे. महिलांनी स्वंयरोजगाराच्या माध्यामातून कुठुंबाला हातभार लावायला हवा. घरगुती लघूउद्यागांच्या माध्यमातून, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन काम करावे व स्वतःचा उत्कर्ष करावा. महिलांना घरगुती स्वरुपात करता येणार्‍या उद्योगांची माहिती या मेळाव्यात महिलांना देण्यात आली. यानंतर महिलांचा शिवबंधन सोहळा संपन्न झाला.


महिला दिनानिमित्त याठिकाणी महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा तसेच बुध्दीवर्धक गेम शो आदी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे सादरीकरण राजेंद्र दिवेकर यांनी केले. मेळाव्याचे सुत्रसंचालन राजलक्ष्मी चँरिटेबल ट्रस्टचे गणेश चव्हाण व अनिता भोसले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.