दगडी गोटी उचलणे स्पर्धेत 160 बैठक मारून सुरेंद्र भिलारे प्रथम

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे धुलीवंदननिमित्त आणि शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या शिवकालीन मर्दानी खेळ दगडी गोटी स्पर्धेत 160 बैठक मारून सुरेंद्र भिलारे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.  

वडगाव, मावळात परंपरेनुसार धुलीवंदन आणि शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रातील मातीतील शिवकालीन मर्दानी खेळ दगडी गोटी उचलणे स्पर्धा घेण्यात येतात. सोमवारी (दि.10) ग्रामदैवत  पोटोबा मंदिर प्रांगणात स्पर्धा पार पाडल्या. स्पर्धेचे संयोजन जय बजरंग तालीमच्या वतीने करण्यात आले होते. 

या स्पर्धेसाठी वापरण्यात येणा-या दगडी गोट्या शिवकालीन आहेत. 85, 95, 105 किलो अशा वजनाच्या   दगडी गोट्या असतात. पंचकृशीतील युवक या गोट्या हाताने उचलून नाकावरून टाकतात. तसेच गोटी खांद्यावर ठेऊन बैठका मारल्या जातात. सुरेंद्र भिलारे यांनी 85 किलो वजनाची गोटी उचलून खांद्यावर ठेऊन 160 बैठका मारून प्रथम क्रमांक पटकावत नवीन विक्रम रचला आहे.  

चिराग वाघवले याने 51 व किशोर धोत्रे याने 53 बैठका मारल्या, सानी शिंदे 50 ,अवधूत म्हाळस्कर 49 ऋषिकेश चव्हाण 41, सौरभ दाभाडे 27, सुधीर म्हाळस्कर 25, आकाश चव्हाण 23,दीपक पवार 15, मयूर चव्हाण 12  बैठक मारल्या आहेत.   

प्रसाद म्हाळस्कर या युवकाने 105 किलो वजनी गोटी उचलून 27 बैठका मारण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी सुरेंद्र भिलारे या युवकाने 105  किलो वजनी गोटी उचलून 22  बैठका मारून विक्रम केला होता. तो अद्यप  कायम होता. परंतु. प्रसाद म्हाळस्कर यांनी 27 बैठका मारून जुना विक्रम मोडला. मध्यम गोटी 95 किलो उचलून 38 बैठका मारल्या.  यापूर्वी सुरेंद्र भिलारे याने मद्यम गोटीवर 57 बैठक मारल्या होत्या.  

यावेळी राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सुधीर म्हाळस्कर यांनी वयाच्या 57  व्या वर्षी 85 किलो वजनी गोटी उचलून बैठक मारण्याचे प्रात्यक्षिक  करून दाखवले. त्यांनी 25  बैठका मारल्या. बाबुराव वायकर, दीपक पवार, सुधीर म्हाळस्कर यांनी गोटी उचलून युवकांमध्ये जोश भरला. 

गणेश जाधव, विक्रम देशमुख, गणेश ढोरे, बंटी वाघावले, महेश ढोरे, अक्षय वायकर, सुहास वायकर, सागर वायकर, रोहित वाघवले, दिनेश ढोरे, राजेंद्र म्हाळस्कर, हेमंत काकडे या युवकांनी 85,95,105 किलो वजनाची गोटी उचली. यावेळी जय बजरंग तालीमच्या वतीने जुन्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.  तर, शिवजयंती  उत्सव कमिटीच्या वतीने बक्षीस देण्यात आले. 

कै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने  वेटलिफ्टिंग मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शुभम तोडकर व प्रशिक्षक विक्रमसिंह देशमुख यांचा क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत ”क्रिडा पुरस्कार 2017” देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्व स्पर्धकांना सुनील ढोरे,   स्नेह ग्रुपच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 

वडगाव शहर शिवजयंती उत्सव संस्थापक भास्करराव म्हाळस्कर, अध्यक्ष दीपक कुडे, कार्यक्रम प्रमुख  संतोष म्हाळस्कर, पोटोबा देवस्थानचे मुख्य  ट्रस्टी सोपानराव म्हाळस्कर,  उपसरपंच संभाजी म्हाळस्कर,  गणेश ढोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, सुधाकर ढोरे, उद्योजक सुनील ढोरे, बाळासाहेब ढोरे , मंगेश ढोरे, बाळासाहेब म्हाळस्कर, अनिल ढोरे, प्रवीण ढोरे, गुलाबराव म्हाळस्कर, उद्योजक विठ्ल भोसले,  किरण भिलारे आदी उपस्थित होते.
"wadgaon
"wadgaon
"wadgaon
"wadgaon
"wadgaon

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.