पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर निवडीचा जल्लोष सुरू

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरमपदी भाजपच्या नितीन काळजे यांची बिनविरोध निवड झाली असून उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया चालू आहे. छाननी मध्ये निकिता कदम आणि शैलजा मोरे यांचे अर्ज वैध ठरले असून माघार घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत देण्यात आली आहे.

 

 

भाजपचे महापौरपदाचे उमेदवार नितीन काळजे हे आमदार महेशदादा लांडगे यांच्यासह बैलगाडीतून महापालिका भवनात दाखल झाले होते. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मोरया गोसावी समाधी मंदिर व क्रांतिवीर चापेकर स्मारकात दर्शन महापालिका भवनाकडे प्रस्थान केले.

 

महापालिका मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई पीठासीन अधिकारी

महापौरपदाच्या उमेदवारी अर्जांची छाननी, भाजपने नितीन काळजे व राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम लांडे यांचे अर्ज वैध

माघारीसाठी 15 मिनिटांची मुदत

""

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.