पाण्याच्या फुगा अंगावर मारल्याच्या कारणावरुन तिघांवर तलवारीने वार

आरोपी गजाआड
एमपीसी न्यूज – धुलीवंदन खेळताना पाण्याच्या फुगा अंगावर फुगा मारल्याच्या कारणावरुन दोघा सख्या भावांनी तिघांवर तलवारीने वार केले. ही घटना सोमवारी (दि.13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शांतीनगर, भोसरी येथे घडली.
चॉद मौलाली शेख (वय 19) आणि आकील मौलाली शेख (वय 20 , दोघे रा. शांतीनगर, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित राठोड (वय 18, रा. भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धुलीवंदन दिवशी रोहित याने आरोपींच्या अंगावर पाण्याचा फुगा मारला होता. त्यातून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यांचे रुपांतर हानामारीत झाले. आरोपींनी रोहित याचे वडील हरिश्चंद्र राठोड आणि त्याच्या चुलत भावावर तलवारीने वार केल्याचे, पोलिसांनी सांगितले. भोसरी पोलीस तपास करत आहे.