चाकण पोलीस विरुद्ध पत्रकार संघाच्या क्रिकेट सामन्यात पोलीस संघाचा विजय

चाकण पोलिसांचा आठ गडी राखून विजय


एमपीसी न्यूज –  पोलीस संघ विरुद्ध पत्रकार संघ यांच्यामध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात पोलीस संघाने पत्रकार संघाचा आठ गडी राखून परावभव केला. चाकण येथील आंबेठाण येथे आज (दि.15) सकाळी  क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

खेड तालुका पत्रकार संघ व चाकण पोलीस ठाणे या दोन संघात 10 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामना पाहण्यासाठी परिसरातील क्रिकेट शौकिनांनी आंबेठाण येथील मैदानावर गर्दी केली होती. या सामन्यात सर्वाधीक 53 धावा करणारे पोलीस संघाचे सचिन जतकर यांनी मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार पटकावला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण व उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व फलंदाजी केली. पोलीस संघात पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, श्रीधर जगताप यांच्यासह सचिन जतकर, प्रशांत वहील, सुनील बांडे, सतीश जाधव, हृषीकेश भोसुरे, नवनाथ खेडकर, संदीप रावते आदींचा समावेश होता.

पत्रकार संघातर्फेही अविनाश दुधवडे, संजय शेटे, सुनील थिगळे आदींनी उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण केले. पत्रकारांच्या संघात पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे, रुपेश बुट्टेपाटील, भानुदास प-हाड , गणेश फलके , सदाशिव अमराळे, महेंद्र शिंदे, राजेंद्र लोथे, नाझीम इनामदार ,रोहिदास होले , सुनील थिगळे, चंद्रकांत मांडेकर, संजय शेटे , शरद भोसले, बाळासाहेब सांडभोर आदींचा समावेश होता. रोहिदास गाडगे, संदीप मिरजे, राजेंद्र मांजरे, आदींनी पंच म्हणून काम पहिले.

सामन्यात सहभागी झालेल्या सर्व पोलीस आणि पत्रकार खेळाडूंचा सहभागाबद्दल चाकणचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व आंबेठाणच्या आजी-माजी सरपंच आणि पदाधिका-यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.