प्राधिकरणातील रस्त्यांवरील राडारोडा उचलण्याची मागणी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणातील म्हाळसाकांत चौक ते आकुर्डीतील मुख्य रस्त्यालगत गेल्या तीन महिन्यापासून पडलेला राडारोडा व सिमेंटचे ब्लॉक उचलण्याची मागणी, जयहिंद मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश फलके यांनी महापालिकेकडे केली आहे. 

याबाबत राजेश फलके यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे. निगडी प्राधिकरणातील पदपथाचे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदाराच्या नियोजन शुन्य कारभारामुळे रस्त्यालगत तब्बल तीन महिन्यापासून जुने ब्लॉक व राडारोडा पडून असल्याने पादचा-यांची गैरसोय होत आहे. 

रस्त्यावर राडारोडा ठेवणा-या ठेकेदारांकडून महापालिकेने शुल्क आकारावे. रस्त्यावरील राडारोडा लवकरात लवकर उचलण्याची मागणी फलके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.