सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

सोलापूरच्या महिलेचा पिंपरीमधील वायसीएम रुग्णालयात स्वाईन फ्लू ने मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज (शुक्रवारी) सोलापूर येथील एका 40 वर्षीय महिलेचा   स्वाईन फ्लू  ने मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत शहरपरिसरातील रुग्णालयात मृत्यू पावलेल्यांची संख्या 5 वर गेली आहे. संबंधित महिला  10 मार्चला  वायसीएममध्ये दाखल झाली होती. तिला 14 तारखेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.  मात्र, आज तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सध्या शहरात स्वाईन फ्लूचे 29 रुग्ण आढळले असून त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.

वातावरणातील बदल, कमी होत जाणारी रोग प्रतिकारक शक्ती, वाढणारा संसर्ग यामुळे गेल्या महिनाभरात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  वैद्यकीय विभागातर्फे महापालिकेच्या 8 ही रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या लस उपलब्ध आहेत. तर शहरातील एकूण 49 दवाखान्यांमध्ये स्क्रीनिंग सेंटर आहेत जिथून स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळताच महापालिका रुग्णालयांना त्वरीत कळविण्यात येणार आहे. शहरात स्वाईन फ्लूसाठी एकूण 9 अतिदक्षता विभाग आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

spot_img
Latest news
Related news