वडमुखवाडी येथे चोरट्यांच्या झटापटीत आजी गंभीर जखमी

92 हजाराचे सोने लंपास

 

एमपीसी न्युज- वडमुखवाडी येथे चोरट्यांनी घरात घुसन केले 92 हजार रुपयांचे दागीने लंपास. यामध्ये66 वर्षीय आजीच्या कानातले हिसकावून काढल्याने आजीचे दोन्ही कान तुटले आहेत. ही घटना काल (बुधवारी ) रात्री 1:30 चा सुमारास घडली.

 

सुभद्रा जगनाथ तापकीर (वय 66 रा.वडमुखवडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या रात्री घरामध्ये झोपल्या होत्या तर त्यांचे नातू व मुले उन्हाळ्यामुळे घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात घुसून आजीला गुंगी चे औषध दिले. घरातील व कपाटातील असे 92 हजार किमतीचे साडे आठ तोळे सोने चोरुन पोबारा केला.

 

चोरट्यांनी आजीच्या कानातले हिसकावले त्यात आजीच्या दोन्ही कानाच्या पाळ्या फटल्या. मात्र याची जाणीवच न झाल्याने हा प्रकार सकाळी घरच्यांना आल्यानंतर उघडकीस आला.याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.