ताम्हीणी घाटातील नजरेआडचा निसर्ग (फोटो फिचर)


एमपीसी न्यूज – पावसाळी भटकंतीसाठी एव्हाना सगळेच सज्ज झाले असतील..डोंगर, द-या,नद्या,नाले प्रत्येकाला खुणावत असतील. परंतू पर्यटनस्थळी होणा-या गर्दीमुळे अनेकांना बाहेर जाणे नकोसे वाटत असेल तर अशांसाठी एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण..पुण्यापासून अवघ्या 90 किमी अंतरावर. ताम्हिणी पासून अवघ्या काही अंतरावर… भांबर्डे आणि घनगड.. ताम्हिणी घाटातील मुख्य रस्ता सोडून आडवाटेचा रस्ता पकडला की, सुरू होते निसर्गाच्या अनोख्या शक्तिची उधळण..कधी संततधार तर कधी मुसळधार…दिवसाच्या उजेडातही रातकिड्यांचा किर्रर्रर्रर्र आवाज…क्षणभरासाठी पावसाने उघडीप देताच पक्षांचा किलबीलाट..रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या उंच डोंगरावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे..आणि नजर जाईल तिकडे  हिरवाईने नटलेली सृष्टी… पावसाळ्यात भटकंतीसाठी जाण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी नक्की जा..

"pherphatka
"pherphatka
"pherphatka
"pherphatka
"pherphatka
"pherphatka
"pherphatka
"pherphatka
"pherphatka
"pherphatka
"pherphatka

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.