सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

राज्यातील निवडणुकांसाठी भाजपचा जाहिरातींवर 2200 कोटी खर्च!

मुख्यमंत्र्यानी स्पष्टीकरण द्यावे; रमेश बागवे यांचा आरोप व मागणी  
 
एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांना पैसे घेण्यासाठी बँकेच्या रांगेत उभा राहावे लागली. मात्र, भाजप सरकारने राज्यातील निवडणुकीसाठी 2200 कोटी रुपयांचा जाहिरातीवर खर्च केला आहे, असा थेट आरोप करत एवढा पैसा कुठून आला, असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी उपस्थित केला. तसेच याबाबतचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, अशी मागणीही केली. 

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज झाली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी माजी आमदार दीप्ती चवधरी, मोहन जोशी आदी उपस्थित होते. 

यावेळी बागवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये असंख्य नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. संपूर्ण जनता रांगेमध्ये उभी असताना यांच्या नेत्याकडे पैसे आले कुठून असा सवाल उपस्थित करीत राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरात बाजी करण्यात आली. या पैशाचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यानी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
spot_img
Latest news
Related news