Bhigwan news: 3 मोटरसायकल व 18 मोबाईल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद करून 3.60 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : भिगवण पोलिसांनी 3 मोटरसायकल व 18 मोबाईल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद करून 3.60 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कृष्णा कांबळे, रा. खानोटा, तालुका दौंड, जिल्हा पुणे व दोन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. ते 13 नोव्हेंबर रोजी रात्री 1.00 चे दरम्यान मौजे डाळज नंबर 2, तालुका इंदापुर गावाच्या हद्दीतून फिर्यादी प्रमोद पानसरे, रा. मौजे डाळज नंबर 2, तालुका इंदापुर गावाच्या हद्दीतून त्यांच्या ऊसतोड कामगार याच्या कोपीच्या बाहेर चार्जिंग साठी लावलेले मोबाईल कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत भिगवन पोलीस ठाण्यात भा. द. वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच भिवंडीच्या ठिकाणाहून दिनांक 30 ऑक्टोबर रोजी 1.30 वा चे सुमारास फिर्यादी जालिंदर जाधव रा. करमाळा, जिल्हा सोलापूर यांच्या मालकीच्या मोटरसायकल चोरी करून नेली होती. त्याबाबत भिगवन पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Navale Bridge Accident : नवले पूल अपघात प्रकरणातील ट्रक चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात, चाकण परिसरातून घेतलं ताब्यात

हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने ऊसतोड कामगारांच्या मनामध्ये भीतीच्या वातावरण निर्माण झाल्याने भिगवण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सायक पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथक डी.बी यांना मार्गदर्शन केले. भिगवन पोलीस ठाण्यात वरील प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास चालू असताना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळवून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी कृष्णा कांबळे, रा. खानोटा तालुका, दौंड जिल्हा पुणे व दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील एकूण तीन मोटरसायकल व पोलीस गेल्या 18 मोबाईल असे एकूण 3.60 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करम्यात आला आहे.

अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, आनंद भोईटे, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रुपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कॉन्स्टेबल विजय लोडी, सचिन पवार, महेश उगले, सलमान खान, अंकुश माने, हसीम मुलानी, अक्षय कुमार, रणजीत मुळीक यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.