Pimpri : पिंपरीत 35 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेला सुमारे 35 हजार रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. रिव्हर रोड, पिंपरी येथे बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

लालचंद अर्जुनदास रामनानी (वय 57, रा. रिव्हर रोड, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी अरुण श्रीराम धुळे (वय 55, रा. भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व सुगंधित तंबाकूचा 34 हजार 672 रुपयांचा साठा आरोपी रामनानी याच्याकडे मिळून आला. पोलिसांनी हा गुटखा जप्त केला आहे. आरोपी लालचंद याच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.