Coronavirus Update: भोसरीतील 40 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू;  शहरातील कोरोनाचे पाच बळी

40 yr old woman dies due to coronavirus in Pimpri taking the total covid19 death toll to 5 in PCMC. भोसरी परिसरात राहणारी ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून नोकरीला होती.

एमपीसी न्यूज – भोसरीतील कोरोना बाधित महिलेचा आज (मंगळवारी) महापालिका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेचे वय 40 होते.  ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून कामाला होती. शहरातील पाच जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, पुण्यातील आठ जणांचा महापालिका रुग्णालयात अशा 13 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

भोसरी परिसरात राहणारी ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून नोकरीला होती. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. महिलेवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा आज मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील कोरोना बळींचा आकडा पाचवर गेला आहे.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा  वायसीएम रुग्णालयात,  भोसरीतील पुरुष रुग्णाचा 10 मे रोजी, 11 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाचा आणि आज 15 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या तीघांचा तर आज 19 मे रोजी भोसरीतील महिलेचा अशा 13 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.