Pimpri: प्रतिबंधित क्षेत्रात वाढ; ‘ही’ 42 ठिकाणे ‘कंटेन्मेट’ तर ‘हे’ 27 भाग ‘कंटेन्मेंट’ झोनमधून बाहेर

Pimpri: increase in a restricted area; 'These' 42 places are 'contained' and 'these' 27 parts are out of 'containment' zone

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ‘कंटेन्मेंट’  झोन (प्रतिबंधिक क्षेत्र) वाढ होवू लागली आहे. आजमितीला शहरातील 42 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून हा परिसर ‘कंटेन्मेंट’  झोन आहे. तर, 27 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’ झोनमधून बाहेर आली आहेत. म्हणजे या भागात आता कोरोनाचे  सक्रिय रुग्ण नाहीत.

कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 19 ते 27 एप्रिल दरम्यान संपुर्ण पिंपरी-चिंचवड शहर ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधिक क्षेत्र) म्हणून घोषित केले होते. त्यानंतर रुग्ण वाढीचा दर कमी झाल्याचे कारण पुढे करत सक्रिय रुग्ण असलेली 21 ठिकाणेच ‘कंटेन्मेंट’ झोन जाहीर केली होती. त्यानंतर ज्या भागात रुग्ण वाढतील तो भाग ‘कंटेन्मेंट’ झोन घोषित केला जात आहे.

शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय प्रभागाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून शहराच्या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये वाढ होत आहे. ज्या भागात रुग्ण सापडतील तो भाग ‘कंटेन्मेंट’ झोन म्हणून घोषित केला जात आहे. 21 वरुन 42 ठिकाणे ‘कंटेन्मेंट’ झोन झाली आहेत. तर, ‘कंटेन्मेंट’ झोन कमी देखील होत आहेत. आजपर्यंत 27 ठिकाणे झोनमधून बाहेर आली आहेत.

शहरातील ‘ही’ 42 ठिकाणे आहेत ‘कंटेन्मेंट’ झोन!

फुगेवाडी, खराळवाडी, भाटनगर, आकुर्डीतील शुभश्री सीएचएस, पिंपळेगुरवतील जगताप कॉम्पलॅक्स, शिवनेरी कॉलनी, विनायकनगर, कवडेनगर, पिंपळेसौदागरमधील शुभश्री गृहनिर्माण सोसायटी, साई पॅरेडाईज, जुनी सांगवीतील मधुबन सोसायटी, पवनानगर, काळेवाडी, रहाटणीतील छत्रपती चौक, तांबे शाळा, तापकीर चौक, ज्ञानगंगा गृहनिर्माण सोसायटी, कस्पटे वस्ती, थेरगावातील दत्तनगर, चिंचवडमधील इंदरानगर, मोहननगर,  आनंदनगर, किवळेतील विकासनगर,

भोसरीतील गुरुविहार सोसायटी, लांडगेनगर,  हनुमान कॉलनी, हुतात्मा चौक, चक्रपाणी वसाहत, मोशीतील बनकर वस्ती,  वुड्स विले, दिघीतील विजयनगर, अमृतधारा, च-होलीतील निकम वस्ती, साठेनगर, रुपीनगर,  पंचदुर्गा परिसर, तळवेडीतील न्यु अँजल स्कूल, ताम्हाणे वस्ती, चिखली मोरेवस्ती, संभाजीनगर येथील आंब्रेला गार्डन, बजाज स्कूल हा भाग  ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये आहे.

या परिसरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे.

‘कंटेन्मेंट’ झोन मधून ‘ही’ 27 ठिकाणे बाहेर!

पिंपरीवाघेरे तपोवन रोड, नेहरुनगर बस डेपो, दापोडीतील गणेशनगर, कासारवाडीतील रामराज प्लॅनेट, पुनावळेतील कुंभार गल्ली, ओव्हाळवस्ती, ताथवडे चौक, वाकडमधील कावेरीनगर पोलीस लाईन, जीवननगर, पिंपळेसौदागर, पिंपळेनिलखमधील शिवाजी चौक, थेरगावातील 16 नंबर बस स्टॉप, शिवतेजनगर, क्रांतीविरनगर, पडवळनगर,  गणराज कॉलनी,

भोसरीतील खंडोबा माळ,  पीएमटी चौक, आदिनाथनगर, शास्त्री चौक, गुरुदत्त कॉलनी,  मोशीतील नागेश्वरनगर, च-होलीतील तनिष्क ऑर्चेड, दिघीतील बी.यू.भंडारी, रोडे हॉस्पीटल, तनिष्क आयकॉन, चिखलीतील घरकूल आणि संभाजीनगर हा भाग  ‘कंटेन्मेंट’ झोन मधून बाहेर आला आहे. या परिसरात आता कोरोनाचे सक्रिय रुग्ण नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.