Pimpri: शहरातील झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव; प्रशासनासमोर आव्हान, आनंदनगर झोपडपट्टी हॉटस्पॉट

Pimpri: Corona infiltration into city slums; Challenge before administration, Anandnagar slum hotspot

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातील चिंचवड स्टेशन येथील दाट लोकवस्ती असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. सोमवारी एकाचदिवशी 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली असून शहराचे लक्ष लागले आहे. हे रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार असून घाम फुटणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. दररोज शहराच्या विविध भागात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. शहरातील कोरोनाच्या रुग्णांनी दोनशेचा आकडा पार केला आहे. 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 225 जणांना कोरोनाची लागण झाली.

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक भागात लहान मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. दाटीवाटीने लोक तेथे वास्तव्यास आहेत. अशा अनेक ठिकाणी कोरोनाचा शिरकाव होऊन तो वाढताना दिसत आहे. चिंचवड स्टेशन येथील आनंदनगरमधील झोपडपट्टीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. मागील काही दिवसांपासून या झोपडपट्टीत दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. सोमवारी एकाचदिवशी 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. ही झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली असून  परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. परिस्थिती आटोक्यात न आल्यास मोठा धोका होवू शकतो.

याशिवाय मोशीतील संजय गांधीनगर, च-होलीतील  साठेनगर, चिखली मोरेवस्ती,  चिंचवड स्टेशन येथील इंदरानगरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. झोपडपट्यांमध्ये दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण होण्याची अधिक भिती आहे. पिंपरीतील गांधीनगरमध्येही रुग्ण सापडले होते. परंतु, प्रशासनाने ते तत्काळ नियंत्रणात आणले. त्यामुळे गांधीनगरमधील पुढील धोका टळला आहे.

आनंदनगरमध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता – आयुक्त श्रावण हर्डीकर

”पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला सक्रिय 75 रुग्ण आहेत. रुग्ण वाढीचा दर 18 टक्के आहे. रुग्ण वाढीचा दर हाच राहिला तर तीनपट रुग्ण होतील. पण, महापालिकेकडून  ट्रॅकिंग फास्ट केले जात आहे. शहरातील काही झोपडपट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. बहुतांश आरोग्य कर्मचारी झोपडपट्यांमध्ये राहतात. ते दररोज कामावर असतात. त्यामुळे महापालिका लक्ष ठेवून आहे. आनंदनगरमध्ये काही दिवसांपासून दररोज रुग्ण आढळत आहेत. आनंदनगरमध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. आनंदगरमध्ये रुग्ण वाढ झाली. तर, ते धोकादायक होईल”, अशी भीती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.