Coronavirus PCMC Update: ‘हॉटस्पॉट’ आनंदनगरमधील आणखी तिघांसह सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

 पुण्यातील तिघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह. 3 more test positive in Coronavirus hotspot Anandnagar, Chinchwadstation while 3 test positive from Rupeenagar and Bhosari

एमपीसी न्यूज – कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील आणखी तिघांचे आज (मंगळवारी) कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर,  भोसरी, रुपीनगरमधील तिघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय पुण्यातील दोन, आंबेगाव येथील एक अशा तिघांसह एकूण नऊ जणांचे आज रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यामध्ये कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच भोसरी, रुपीनगरमधील तिघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 78 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. 60 वर्षीय आणि 31 वर्षीय महिलेचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय आंबेगाव येथील 38 वर्षीय पुरुषासह पुण्यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

महापालिका रुग्णालयात 82 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील 11 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 131 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भोसरीतील महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील पाच आणि महापालिका हद्दीबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात आठ अशा 13 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.