Pune : मुठा कालवा दुर्घटनेतील बाधितांना संजय काकडे करणार खासदार निधीतून 50 लाखांची मदत

एमपीसी न्यूज – मुठा उजवा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेतील बाधितांना खासदार संजय काकडे हे खासदार निधीतून 50 लाख रुपयांची मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच शक्य असल्यास बाधित नागरिकांचे स्वतः पुनर्वसन करणार, असेही त्यांनी सांगितले.

मुठा उजवा कालवा फुटून झालेल्या दांडेकर वस्ती येथील बाधित नागरिकांच्या घराघरात जाऊन खासदार संजय काकडे यांनी आज चौकशी करून मदत जाहीर केली.

तसेच यावेळी पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देणे गरजेचे होते. मात्र, ते का आले नाहीत हे माहित नसून यामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकते. तसेच घटनेला पालकमंत्री जबाबदार आहे या अजित पवार यांच्या वक्तव्यात तथ्य आहे, असे म्हणत पालकमंत्र्यांवर ताशेरे ओढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.