Maval Corona Update : मावळ तालुक्यात रविवारी 52 नवीन रुग्ण; 33 जणांना डिस्चार्ज

52 new corona patients today in Maval; 33 persons discharged.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (रविवारी, दि. 23) कोरोनाचे 52 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 707 झाली आहे. तर दिवसभरात 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण कामशेत (महिला, 70 वर्ष), शिरगाव (महिला, 72 वर्ष), तळेगाव (पुरुष, 55 वर्ष) येथील आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 30 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 22 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कुसगाव येथील 6, कामशेत, टाकवे येथील प्रत्येकी 4, कुरवंडे 2, शिरगाव, कुणे ना मा, वाकसाई, कार्ला, महागाव, मळवली प. मा. येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 21, लोणावळा शहरात 9 रुग्णाची नोंद झाली आहे. वडगावमध्ये आज एकही रुग्ण आढळला नाही.

एकूण 1 हजार 707 रुग्णांमध्ये सध्या 383 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 259 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 566, लोणावळा नगरपरिषद 194 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 120 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 827 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.