आतड्याचा कॅन्सर त्यात हृदयविकाराचा झटका या सा-यातूनही बचावले 60 वर्षीय आजोबा

आदित्य बिर्लाच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील प्रभाकर मु-हाळकर यांना आतडयाचा कॅन्सर म्हणजेच कोलन किंवा रेक्टम या आजाराने ग्रासले होते. यावरील उपचारासाठी ते चिंचवडच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात ते दाखल झाले. मात्र, त्यांना उपाचारादरम्यान आलेला हऋदयविकाराचा झटका, खालवत जाणारी प्रकृती, वयोमान या सा-या अडचणीवर मात करत आदित्य बिर्लाच्या डॉक्टरांनी मुराळकर यांना अगदी ठणठणीत करून  घरी पाठवले.

मु-हाळकर हे मध्यमवर्गीय रुग्ण कोलनच्या आजाराने त्रस्त होते व ते आदित्य बिर्ला रुग्णालयातील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयंत गावंडे यांच्याकडे नियमित उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना केमोथेरपीचे उपचार देण्यात येत होते. एके दिवशी त्यांना अचानकपणे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. ईसीजी काढून तपासणी केल्यानंतर  मु-हाळकर यांच्या हृदयाचे काम कमी गतीने होऊ लागले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना त्वरीत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येऊन अॅन्जिओप्लास्टीचा सल्ला देण्यात आला.  तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही या सर्व गोष्टीची कल्पना देण्यात आली. रुग्णाचा अॅन्जिओग्रॅम करण्यात आला व मुख्य रक्तवाहिनीतून 90 टक्के ब्लॉक दूर करण्यात आले. कमी रक्तदाबाच्या त्रासामुळे रुग्णाला मूत्रविकारांचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांचे डायलिसीस सुरु करण्यात आले.


याविषयी बोलताना वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजेश बदानी म्हणाले की, मु-हाळकर हे कॅन्सरचे रुग्ण असल्याने आणि त्यांच्यावर केमोथेरपीचे उपचार सुरू होते. तसेच कोलनचा कॅन्सर असल्याने त्यांना आतड्यातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्त कमी झाले होते. तसेच त्यांचे वय थोडे जास्त असल्याने गुंतागुंत होती. ते पुढे म्हणाले की, अॅन्जिओप्लास्टी झाल्यानंतर आम्ही आयएबीपी (इन्ट्रा आरोटिक बलून पंप) वापरला. अशा त-हेच्या रुग्णांना ज्यांची हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर  बाहेरून मेकॅनिकल सपोर्ट जरुरीचा असतो त्यासाठी वापरला जातो. हा पंप थोडा काळासाठी वापरल्यामुळे त्यांचे हृदय आपोआपच हळूहळू दुरुस्त होते आणि त्याचे कार्य पूर्ववत सुरू होते.

त्यानंतर आदित्य बिर्ला रुग्णालयातील मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. तरुण जलोका यांच्या मार्गदर्शनाखाली डायलिसीस सुरू करण्यात आले. तसेच डॉ. संदीप बारटक्के हे रक्तविकारतज्ज्ञ सतत त्यांचा रक्तदाब आणि रक्ताचे प्रमाण तपासत होते. कारण त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होत होते. वरिष्ठ गॅस्ट्रोइंस्टेस्टिनल तज्ज्ञ डॉ. एम. के. पांडा यांनी देखील उपचार केले. पुढील 24 ते 36 तासानंतर रुग्णाला पुरेशा प्रमाणात लघवी होऊ लागली आणि रक्तदाब देखील नियमित झाला. 72 तासानंतर आयबीपी देखील काढण्यात आला. रुग्ण शुद्धीवर आल्यानंतर पुढील तीन दिवसात पूर्वपदावर आला.

मी आदित्य बिर्ला रुग्णालय व तेथील सर्व डॉक्टरांचा माझ्या वडिलांचे प्राण वाचविल्याबद्दल खूप आभारी आहे. हे बहुविध उपचारांसाठी सुसज्ज असे रुग्णालय असल्याने आम्ही आमच्या वडिलांना त्वरीत येथे आणले आणि वडिलांना येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध झाले, यामुळे मला समाधान आहे. अगदी थोड्या कालावधीत येथील हृदयविकारतज्ज्ञ, रक्तविकारतज्ज्ञ, मूत्रविकारतज्ज्ञ यांच्या साथीने कॅन्सरतज्ज्ञ डॉक्टरांनी माझ्या वडिलांना तपासले आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले. त्यांनी केलेल्या त्वरीत निदानामुळे आणि उपचारांमुळे माझ्या वडिलांची प्रकृती सुधारू शकली, अशा भावना  मु-हाळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी भावना व्यक्त केल्या.
"abmh"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.