Pune : राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी खासदार वंदना चव्हाण यांचे नाव आघाडीवर

पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ?

एमपीसी न्यूज- राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला राज्यसभेचे उपसभापतीपद मिळते का हे पाहावे लागणार आहे. राज्यसभेचे उपसभापती पी.जे.कुरियन यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. या पदासाठी विरोधी पक्षांमधून वंदना चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी 123 मतांची गरज आहे. भाजप 69 जागांसह सभागृहात सर्वात मोठा पक्ष असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे. आपले काही मित्र पक्ष आणि अपक्ष अशी तोडजोड करून 115 पर्यंत भाजपचा आकडा पोहोचतो. पण 13 खासदार असलेली AIDMK कुठल्या बाजूने मतदान करणार हे स्पष्ट नाही. दरम्यान, वंदना चव्हाण यांची वर्णी जर राज्यसभेच्या उपसभापतीपदी लागली तर पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल यात शंका नाही.

मात्र, संख्याबळाचा विचार केला तर ही गोष्ट इतकी सोपी देखील दिसत नाही. राष्ट्रवादीसह विरोधकांना यासाठी इतर विरोधकांचे देखील संख्याबळ मिळवावे लागणार आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी 9 ऑगस्टला निवडणुका होणार आहेत. सभापती एम वेंकैया नायडू यांनी राज्यसभेत याची घोषणा केली. यासाठी बुधवारी 8 ऑगस्टला 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.