Pimpri: पालिकेच्या सफाई कामगारांना सुरक्षेची साधने मोफत देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यकता असून त्यांना जीवनावश्य वस्तूसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरविण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की , पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छतेची कामे करणा-या कामगारांच्या आरोग्याबाबत महापालिका प्रशासन निष्काळजीपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योजना असल्या तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे, पावसाळा सुरू झाल्याने उपाययोजना करण्यात यावी.

महापालिकेच्या सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यक साधने मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हातमोजे, गमबुट, मास्क,रेनकोट, गणवेश,साबण, अशा किमान सुविधाही त्यांना पुरविल्या जात नसल्याने या कामगारांमध्ये कर्करोग, त्वचारोग, टीबी, श्वसनविकाराचे प्रमाण वाढत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे आरोग्य सुदृढ ठेवणा-या या सफाई कामगारांचे आरोग्य मात्र वा-यावर आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन सफाई कामगारांना तात्काळ सुरक्षेची आवश्यक साधने देण्यात यावीत. अन्यथा संघटनेच्या वतीने महापालीकेचा तीव्र निषेध करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा सतीश कदम यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.